Supriya Sule: "सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या 2100 रुपयेची वचनपूर्ती करणार का? सुप्रिया सुळे
लोकशाही मराठी न्यूज चॅनेल आयोजित 'ग्लोबल महाराष्ट्र' महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी काल भव्य संमेलन पार पडल. या कार्यक्रमाला दुपारी 2 वाजल्यापासून सुरुवात झाली असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती.
याचपार्श्वभूमिवर सुप्रिया सुळे यांनी महायुती समोर प्रश्न उपस्थित केला आहे. पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या 2100 रुपयेची वचनपूर्ती करणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 2100 रुपये महिलांना देणार असं त्यांनी सांगितलं होतं ते त्यांनी या बजेटमध्ये करावं. इलेक्शनच्या आधी तुमची एक स्कीम होती, असं काय झालं या इलेक्शनमध्ये की, 5 लाख महिला डिलीट झाल्या. सगळ्यांची फसवणूक किंवा ओव्हर कमिटमेंट झाली".
"तुम्ही प्रत्येक स्कीमला 30 टक्क्यांचा कट दिला आहे, यालाच फिजिकल मॅनेजमेंट म्हणतात. माझी पहिली आणि मोठी अपेक्षा आहे की सरसकट कर्जमाफी व्हावी जो त्यांचा शब्द आहे. सोयाबीन ची बातमी तुम्हीच दाखवली आहे. बाकी कांदा आणि इतर प्रश्न आहेत त्यावर सुद्धा संशोधन झालं पाहिजे. एकवीसशे रुपये महिलांना देणार असं त्यांनी सांगितलं होतं ते त्यांनी या बजेटमध्ये करावं. या अर्थसंकल्पात त्यांनी ते करावं, त्यांनी भाषणात जे सांगितलं तेवढे त्यांनी सर्व करावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत".