वर्ध्यातील बैठकीत भाजपच्या अंतर्गत नाराजी होणार का दूर?

वर्ध्यातील बैठकीत भाजपच्या अंतर्गत नाराजी होणार का दूर?

वर्ध्यात भाजप पक्षातील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ध्याच्या दौऱ्यावर येत असून कोअर कमिटीची बैठक घेणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

भूपेश बारंगे |वर्धा : वर्ध्यात भाजप पक्षातील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ध्याच्या दौऱ्यावर येत असून कोअर कमिटीची बैठक घेणार आहे. भाजप पक्षातील नाराजी असलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत करणारा असल्याचे बोलले जात असून यातून काय मार्ग निघतो हे बैठकीनंतर समोर येणार आहे. भाजपच्या दुसऱ्या लोकसभा उमेदवारी यादीत वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या गटात नाराजी कुचबुच सुरू झाली.

भाजपचा लोकसभा उमेदवार निष्क्रिय असल्याचे आरोप भाजपचे माजी पदाधिकारी यांनी केला होता. त्यातच भाजप पक्षातच अंतर्गत वाद सुरू असल्याने याची कुणकुण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकण्यात आली. त्यामुळे ही बैठक आयोजित केली असल्याची चर्चा आहे. भाजपचा एक गट नाराज असून तेली समाजातील काही नेते नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.

वर्धा लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा यांना उमेदवारी नको असा दबक्या आवाजात सुर होता. त्यामुळे यांना पराभूत करण्यासाठी भाजपचे काही मंडळी लागणार असल्याची कुणकुण सुरू होती. त्यामुळे भाजपचा उमेदवार पराभूत होऊ नये यासाठी आज सायंकाळी वर्ध्याच्या बाहेर इव्हेंटसेलिब्रेशन हॉलमध्ये १५० पदाधिकारी सोबत कोअर कमिटीची बैठक होत आहे. यात कोणता तोडगा निघतो याकडे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुक प्रमुख यशस्वी होणार?

वर्धा लोकसभा निवडणुक प्रमुख म्हणून भाजप पक्षाने सुमित वानखडे यांची नियुक्ती केली आहे. भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी दोन वर्षांपासून त्यांनी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. सोबतच भाजप कार्यकर्त्यांशी सवांद साधला आहे. यातच बूथ बैठकी लावल्या आहे. त्यामुळे सुमित वानखडे हे तळागळापर्यंत पोहचल्याने भाजपचा नाराजी गट यांच्या कडे गऱ्हाणे मांडत होते. त्यावरून ही बैठक घेण्यात येत असल्याची चर्चा आता समोर आली आहे. या बैठकीत भाजपच्या नेत्यांना तंबी देण्यात येणार असून कडक सूचना दिल्या जाणाऱ्या असल्याचे बोलले जात आहे. झालगेल विसरून जाऊन कामाला लागण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. यात भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख सुमित वानखडे यशस्वी होणार का याकडे आता लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com