संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार झाली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी 10 वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. सात डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत 23 दिवसांचे हे हिवाळी अधिवेशन असणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात संसदेच अधिवेशन होणार होते. मात्र, गुजरात निवडणुकीमुळं हे अधिवेशन उशीरानं सुरु होत आहे.

हे अधिवेशन डिसेंबरच्या शेवटपर्यंत म्हणजे 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. गुजरात विधानसभेसाठी 1 आणि 5 डिसेंबरला मतदान झाले होते. याची 8 डिसेंबरला म्हणजे उद्या मतमोजणी होणार आहे. तसेच हिमाचल प्रदेश निवडणुकीची मतमोजणी देखील उद्याच होणार आहे. दरम्यान हे अधिवेशन 23 दिवसांचे असणार आहे. यामध्ये 17 बैठका होणार आहेत.

या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे वादाचे पडसाद उमटणार असून शिवसेना ठाकरे गट या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवणार आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याची शक्यता आहे. भारत-चीन सीमा विवाद, घटनात्मक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप यासह महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीबाबत काँग्रेसकडून सभागृहात मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com