Nag Panchami 2025 Wishes : श्रावणातील पहिला सण करा आनंदाने साजरा! नागपंचमीनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा
श्रावण मासारंभाला सुरुवात झाली आहे. तर श्रावणातील पहिला सण म्हणून नागपंचमी साजरा केली जाते. यंदा नागपंचमी मंगळवार 29 जुलै 2025, रोजी साजरा केली जाणार आहे. श्रावणात महादेवाची मनोभावे आराधना करतात. महादेवाला प्रिय आहे ते म्हणजे त्यांच्या गळ्यातील सर्प. याच नागदेवताची पूजा केल्याने महादेव अधिक प्रसन्न होतात. नागपंचमीनिमित्त आपल्या प्रियजनांना, मित्रपरिवाला आणि नातेवाईकांना द्या या शुभेच्छा...
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई गोड गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी,
सुख-समृद्धी मिळो सर्वांना जीवनी
नागपंचमीच्या शुभेच्छा!
समुद्र मंथनाने कळळी
जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वदंती
नागपंचमीच्या शुभेच्छा!
रक्षण करूया नागराजाचे,
जतन करूया निसर्गदेवतेचे,
नागपंचमीच्या शुभेच्छा!
नागपंचमीच्या दिवशी
तुमच्यावर नागदेवतांची
सदैव कृपा असू दे
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !"
शिवाच्या गळ्यात सर्प
दिसतो अतिसुंदर
आज नागपंचमीच्या दिनी
करूया नागदेवताला वंदन
नागपंचमीच्या शुभेच्छा!