Rakshabandhan
Rakshabandhan Team Lokshahi

भाऊ नसल्याची खंत न ठेवता दोन बहिणींनी साजरी केली आगळीवेगळी रक्षाबंधन

बहिणेने दिले बहिणीला समाजातील अनिष्ट रूढी आणि वाईट प्रवृत्तीपासून रक्षा करण्याचे वचन

प्रमोद लांडे | Rakshabandhan : संपूर्ण देशात आज रक्षाबंधन साजरा केला जात आहे. रक्षाबंधन म्हंटल तर बहिण भावाच्या बंधनांचा सण. बहिणीच्या रक्षणाची शपथ देऊन बहिण राखीचा धागा भावाच्या हातावर बांधते आणि सदैव पाठीशी उभं रहाण्याचे वचन भावाकडून घेते. मात्र एक आगळावेगळा प्रकार आता समोर येत आहे. बहिणीला भाऊच नसल्याने निराश न होता बहिणच भावाची भूमिका बजावत आहे. (Two sisters celebrate different Rakshabandhan)

Rakshabandhan
रवी राणांनी साजरी केली शेकडो भगिनींसोबत रक्षाबंधन; राखीवर 'भावी मंत्रीसाहेब' उल्लेख

राजगुरुनगर येथील या दोन चिमुकल्यांनी भाऊ नाही म्हणून खंत न ठेवता झाशीची राणी, राजमाता जिजाऊ, आहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन एकमेकींना राखी बांधून समाजातील अनिष्ट रूढी आणि वाईट प्रवृत्ती पासून रक्षा करण्याचे जणू वचनच दिले. समाजाला आम्हीही कुठे कमी नाही असं म्हणत चिमुकल्या बहिणीच्या रक्षण करण्याची जबाबदारी घेत रक्षेचा धागा बांधला.

समाजात आजही अनेक ठिकाणी नकोशी पाहायला मिळतात. लेकीला नकोशी म्हणून जन्मदातीच तिला रस्त्यावर सोडून निघून जातात. जिवंतपणीच लेकीला मरणाच्या यातना देणाऱ्यांना या दोन बहिणींनी आदर्श घालून दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com