Tiger Attack Viral News
Tiger Attack Viral News

फुलाचा 'मोह' जीवावर बेतला! मोहफूल गोळा करायला गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला अन् तितक्यात...

भंडारा येथील पवनी तालुक्यातील कन्हाळगाव येथे वाघाने महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Published by :

जंगल सफारी करणाऱ्यांची खतरनाक वन्य प्राण्यांनी शिकार केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कन्हाळगाव येथेही अशीच एक धक्कादायक घटना घडलीय. मोहफूल संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केल्यानं त्या महिलेचा मृत्यू झाला. सीताबाई दडमल (६०) असं मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्हाळगाव येथील सीताबाई दडमल ही महिला गावाशेजारी असलेल्या शेतात सकाळी मोहफुल संकलन करण्यासाठी गेली होती. परंतु, दुपार झाल्यानंतरही महिला घरी परतली नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी शेतात जाऊन महिलेचा शोध घेतला. वाघाच्या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाल्याचं गाकऱ्यांनी पाहिलं. या घटनेमुळे कन्हाळगाव परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com