Nagpur Violence: नागपूर हिंसाचारादरम्यान जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nagpur Violence: नागपूर हिंसाचारादरम्यान जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नागपूरमध्ये 2 गटात दगडफेक झाली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नागपूरमध्ये दोन गट समोरासमोर आल्याने नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीच्या वादातून 2 गटात दगडफेक झाली. यामध्ये काही नागरिक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आले.

यातच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नागपूर हिंसाचारा दरम्यान जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. नागपूरमध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

अनेक ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना, अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी जमावाविरोधातगणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे आता संतापाचे वातावरण पसरले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com