पुणे एअरपोर्टवर बॉम्ब स्फोट करण्याची महिलेने दिली धमकी आणि...

पुणे एअरपोर्टवर बॉम्ब स्फोट करण्याची महिलेने दिली धमकी आणि...

पुणे एअरपोर्टवर बॉम्ब स्फोट करण्याची महिलेने दिली धमकी
Published by  :
Siddhi Naringrekar

चंद्रशेखर भांगे, पुणे

पुणे एअरपोर्टवर बॉम्ब स्फोट करण्याची धमकी देत अफवा पसरवणाऱ्या एका महिलेवर विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निता प्रकाश कपलानी वय ७२ असे गुन्हा दाखल झालेल्या महीलेचे नाव आहे.

दिल्लीची रहीवासी असलेली कपलानी हीने माझ्याजवळ चारीही बाजूला बॉम्ब आहेत असे एअरपोर्टच्या महिला पोलीस अधिकाऱ्याला सांगतल्यानंतर घाबरलेल्या प्रशासनाची प्रचंड मोठी धावपळ उडाली.

वृद्ध महिला ही दिल्लीच्या गुडगाव येथील रहिवासी असून ती पुणे एअरपोर्टवर दिल्लीला जात असताना तिची तपासणी करणाऱ्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याला माझ्या चारही बाजूला बॉम्ब लावले आहेत आणि मी विमानतळ उडवून देणार आहे अशी धमकी दिली. धमकी नंतर प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com