स्त्री व बाल रुग्णालय संपूर्ण क्षमतेने सुरू होणार; आमदार मदन येरावार यांची माहिती

स्त्री व बाल रुग्णालय संपूर्ण क्षमतेने सुरू होणार; आमदार मदन येरावार यांची माहिती

आरोग्य विभागाची वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आमदार मदन येरावार यांनी घेतली.
Published on

संजय राठोड| यवतमाळ : मागील भाजप सरकार काळात यवतमाळ येथे स्त्री व बाल रूग्ण्यालयाकरीता ३९ कोटी रुपये मंजुर करण्यात आले होते. सदर रुग्णालयाचे प्रशस्त इमारत बनवून देखील तयार झाले आहे. यवतमाळ शहराच्या आरोग्य सुविधेत भर घालणाऱ्या या रुग्णालयाला लवकरात लवकर रुग्णालय स्टाफ व सर्व आवश्यक यंत्र सामग्री तात्काळ उपलब्ध करून करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

स्त्री व बाल रुग्णालय संपूर्ण क्षमतेने सुरू करण्याकरीता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या दालनात मंत्रालयाच्या आरोग्य विभागाची वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आमदार मदन येरावार यांनी घेतली. स्त्री व शिशू रुग्णालयासंबंधीत प्रलंबित सर्व प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले. सदर रुग्णालय काही महिन्यातच पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे, अशी माहिती आमदार मदन येरावार यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com