Admin
बातम्या
Budget Session: महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेत महिला 'लक्षवेधी'; घुमणार महिला आमदारांचा आवाज
महिला दिनाचं पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला धोरणावर चर्चा केली जाणार आहे.
महिला दिनाचं पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला धोरणावर चर्चा केली जाणार आहे. महिला धोरण महिला दिनी मंजूर व्हावे असा महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रयत्न होता.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता. यात यशोमती ठाकूर, देवयानी फरांदे, भारती लव्हेकर, मंदा म्हात्रे, श्वेता महाले, यामिनी जाधव, जयश्री जाधव, सरोज अहिरे, यांचा समावेश आहे.
विधानसभा कामकाजात आठ लक्षवेधी सूचना दाखवण्यात आल्या आहेत. त्यातील सात लक्षवेधी मांडण्याची संधी महिला आमदारांना दिली जाणार आहे. आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये राज्याच्या प्रस्तावित महिला धोरणावर चर्चा केली जाणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील महिला सदस्य या धोरणासंदर्भात सूचना मांडतील.