लग्न...डान्स..आनंद अन् मृत्यू; डान्स करतानाच तरुणीचा मृत्यू

लग्न...डान्स..आनंद अन् मृत्यू; डान्स करतानाच तरुणीचा मृत्यू

मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यामधून धक्कादायक बातमी समोर येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यामधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. याचा धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला आहे. लग्नामध्ये डान्स करत असताना एक तरुणी स्टेजवरच कोसळली असून त्या तरुणीचा मृत्यू झाला आहे.

लग्न समारंभ सुरू होता. या लग्नासाठी परिणीता जैन ही तरुणी आली होती. या लग्नामध्ये परिणीता जैन डान्स करत होती, मात्र अचानक ती स्टेजवरच कोसळली. परिणीता उठत नसल्याचं पाहून नातेवाईक स्टेजवर धावले.

नातेवाईकांनी त्या तरुणीला रुग्णालयात नेले मात्र त्या आधीच परिणीताचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या तरुणीचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com