नऊवारीचा साज, नाकात नथ आणि औक्षण, G-20 च्या पाहुण्यांचे खास स्वागत
Admin

नऊवारीचा साज, नाकात नथ आणि औक्षण, G-20 च्या पाहुण्यांचे खास स्वागत

संभाजीनगरमध्ये जी 20 परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

संभाजीनगरमध्ये जी 20 परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी वेगवेगळ्या देशातील 150 महिला सदस्य उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस ही परिषद सुरू राहणार आहे. या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भागवत कराड आणि रावसाहेब दानवेही उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी विदेशी पाहुण्यांची उपस्थिती आहे. त्यांच्या स्वागतासाठी खास ढोल आणि लेझीम पथक होते. त्यांचे खास मराठमोळ्या पद्धतीने नऊवारी नेसून पुष्पहार आणि शाल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. जवळपास जी -२० च्या ३८ महिला सदस्यांची उपस्थिती आहे.

यावेळी त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय वित्त् राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम , उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, अंजली धानोरकर, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार ज्योती पवार, निलावाड उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com