Mumbai Local : धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग

मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलेसोबत विनयभंगाची घटना घडली.
Published by  :
Team Lokshahi

मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलेसोबत विनयभंगाची घटना घडली.चर्नी रोड ते ग्रँट रोड स्थानकादरम्यान चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका व्यक्तीने महिलेसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना 23 जूनच्या रात्री घडली. मात्र 5 दिवसांनी एफआयआर नोंदवण्यात आला.

महिलेच्या तक्रारीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून तरुणाची ओळख पटली असली तरी अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. मुंबई सेंट्रल जीआरपीमध्ये 354A अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com