गोठवणाऱ्या थंडीत 21 दिवसापासून महिला उपोषणावर...! दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी महिला आक्रमक

गोठवणाऱ्या थंडीत 21 दिवसापासून महिला उपोषणावर...! दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी महिला आक्रमक

देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. महिला अत्याचाराच्या घटनात वाढ झाली.
Published by :
Siddhi Naringrekar

अनिल ठाकरे,चंद्रपूर

देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. महिला अत्याचाराच्या घटनात वाढ झाली.मात्र आपले प्रश्न सोडवण्यासाठी महिला प्रशासनाला हाक देत असतात.मात्र बधीर प्रशासनाचे महीलांच्या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असते. याचा प्रत्यय चंद्रपुरातील महिलांना येत आहे.बिअर बार ,बिअर शॉपी आणि दारू दुकानाचा स्थलांतरासाठी 21 दिवसापासून गोठविणाऱ्या थंडीत महिलांचे उपोषण सुरू आहे. मात्र महिलांच्या या उपोषणाकडे जिल्हा प्रशासनाचे अद्याप लक्ष गेले नाही.

या दुकानापासून बुद्ध विहार, मज्जिद आणि प्रसूती केंद्राचे अंतर शंभर मीटरच्या आत आहे. असे असताना या दुकानाला परवानगी मिळालीच कशी ? असा प्रश्न महिला उपस्थित करीत आहेत. उपोषणकर्त्या बाबूपेठ वार्डातील महिला आहेत. दुकानासमोरच त्यांचे उपोषण सुरू आहे. विद्यार्थिनी, महिला ज्या मार्गाने ये-जा करतात त्याच मार्गावर ही दुकाने आहेत. दुकान परिसरात मद्यापिंची मोठी गर्दी असते.भांडण,शिव्याशाप देण्याचे प्रकार इथ घडत असतात. याचा त्रास महिलांना होतो आहे.

महात्मा फुले चौकत असलेले देशी दारूचे दुकान यवतमाळ जिल्हातून चंद्रपूर येथे स्थलांतर केलेले आहे. विशेष म्हणजे हे दुकान वस्तीतील एका घरात भाड्याने आहे. या दुकानाला परवानगी देऊ नका अशी मागणी लावून धरली होती. मात्र महिलांच्या विरोधांना न जुमानता प्रशासनाने परवानगी दिली. ही दुकाने इतरत्र स्थलांतर करण्यात यावे ही मागणी घेऊन महिलांनी नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशन गाठलं. एवढी त्यांना दुकान स्थलांतरित केलं जाईल असं आश्वासन दिल गेल. मात्र लोकप्रतिनिधींनी दिलेला आश्वासन फोल ठरल्याने महिला आक्रमक झाल्या आहे. ही तिन्ही दुकाने बंद करण्याची मागणी आता महिलांनी लावून धरली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com