Nashik : नाशिक मधील वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याचं काम सुरु, मनपाकडून कारवाई

नाशिकमधील वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याचं काम जोरात, मनपाकडून कारवाई आणि परिसरात तगडा बंदोबस्त. हिंदुत्त्ववादी संघटनांकडून आंदोलनाचा इशारा.
Published by :
Prachi Nate

नाशिकमधील वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याचं काम सुरु आहे. काठे गल्लीतील मनपाकडून कारवाई सुरु आहे. परिसरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हिंदुत्त्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात येणार असा इशारा सुद्धा देण्यात आला होता.

25 वर्ष पाठपुरावा करून देखील मनपा दर्गा हटवत नसल्याने हा इशारा देण्यात आला होता. अनधिकृत दर्गा हटवण्याचा हा इशारा देण्यात आलेला आहे. सकल हिंदुत्त्ववादी संघटनांच्या आधी संपुर्ण पोलिस प्रशासन हे खडबडून जाग झालेलं आहे. त्याचसोबत घटनास्थळी भाजपा आमदार देवयानी फरांदे दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच आमदार देवयानी फरांदे यांना अनधिकृत धार्मिक स्थळाची पाहणी करण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केला असल्याची देखील सुत्रांची माहिती आहे. तर आता अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण सुरू आहे त्यामुळे आत मध्ये जाऊ नका अशी विनंती पोलिसांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com