ठाण्यात मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोन कामगारांचा मृत्यू
Admin

ठाण्यात मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

ठाण्यात मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ठाण्यात मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नौपाडा येथे सांयकाळी सव्वासहा वाजता ही घटना घडली. बी- केबिन येथे सत्य नीलियम या नवीन इमारतीची पायाभरणी सुरु होती. त्यावेळी अचानक मातीचा ढिगारा कोसळला.

पोलीस व आपत्ती विभागाला याची माहिती देण्यात आली. याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, अतिक्रमण निष्कासन विभाग व पोलिसांनी घटनास्थळी पोहचले. त्यांना उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दोन कामगारांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यु झाला. तर जखमीवर उपचार सुरु आहेत. या घटनेचा पोलिस तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com