मॉर्निंग वॉकथॉन्सने माती वाचवा मोहिमेबद्दल जनजागृती करत महाराष्ट्रात आज जागतिक माती दिन साजरा झाला

मॉर्निंग वॉकथॉन्सने माती वाचवा मोहिमेबद्दल जनजागृती करत महाराष्ट्रात आज जागतिक माती दिन साजरा झाला

आज २० व्या जागतिक मृदा दिनानिमित्त मुंबई शहर, नवी मुंबई तसेच पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या प्रमुख शहरांमध्ये मातीच्या ऱ्हासाबद्दल जनजागृती करण्यासाठी मॉर्निंग वॉकथॉन आयोजित केले गेले.
Published by :
Sagar Pradhan

मुंबई: आज जागतिक मृदा दिनानिमित्त, माती वाचवा मोहिमेचा भाग म्हणून महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत मातीचा ऱ्हास थांबवण्याबाबत जनजागृती करण्यासाठी वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले. UN FAO (Scientific American, २०१४) नुसार, जगातील सर्व माती ६० वर्षांच्या आत नष्ट होऊ शकते, ज्यामुळे मानवतेचे भविष्य गंभीर धोक्यात येऊ शकते. हे समजून घेऊन, ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी माती वाचवण्यासाठी धोरणात्मक हस्तक्षेपाच्या उद्देशाने यावर्षी ‘माती वाचवा’ ही जागतिक लोकचळवळ सुरू केली.

मोहिमेची तीव्रता सुरू ठेवत स्वयंसेवकांनी अनेक शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी संवाद साधला आणि ‘माती वाचवा’ स्टिकर्सचे वाटप केले; या मध्ये भाईदास हॉल, जेव्हीपीडी, गुलमोहर रोड, विलेपार्ले, मिठीबाई कॉलेज, चेंबूर रेल्वे स्टेशन, नरिमन पॉइंट ते मरीन लाइन्स रेल्वेमार्गे मरीन ड्राइव्ह, बोरिवली पश्चिमेतील इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटर, इलेक्ट्रिसिटी टॉवर, डोंबिवली पूर्वेतील ९० फूट रस्ता, इस्टर एक्स्प्रेस हायवेवर शेल पेट्रोल पंपमार्गे तीन हात नाका चा वॉकिंग ट्रॅक, भाईदास हॉल ते जुहू चौपाटी, इत्यादी जागांचा समावेश होता.

नवी मुंबईत अशाच प्रकारच्या वॉकथॉनचे प्रदर्शन ऐरोलीतील सेक्टर 5 चिंचवले गार्डन, खारघरमधील सेक्टर-7 मधील हिरानंदानी क्रिस्टल प्लाझा, आणि वाशीतील सेक्टर-16 चा शिवाजी पुतळा या ठिकाणी पाहायला मिळाले.

पुण्यातही अण्णा भाऊ साठे सभागृह, पुणे - सातारा रोड, बिबवेवाडी, पिंपळे सौदागरमधील शिवार चौक, शनिवार वाडा, शनिवार पेठ, खराडी येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर अशा प्रमुख ठिकाणी अनेक वॉकथॉन पाहायला मिळाली.

औरंगाबादमधील क्रांती चौक, नागपूरमधील मानेवाडा चौक, नाशिकमधील ठक्कर बाजार आणि सेंट्रल बस स्टँड, अमरावतीमधील राजकमल स्क्वेअर, तसेच कोल्हापूर, सोलापूर, यवतमाळ आणि धुळे येथील नंदुरबार या प्रमुख शहरांमध्ये एकाच वेळी वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले.

आज सकाळी, माती वाचवा लोकचळवळीचे नेतृत्व करणाऱ्या सद्गुरूंनी जागतिक #ScoreforSoil (स्कोअर फॉर सॉईल) मोहिमेची सुरुवात केली. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम लोकांना त्यांच्या सर्वोत्तम फुटबॉल शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यासाठी आणि #ScoreForSoil असा हॅशटॅग वापरून मातीवाचवा मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित करेल.

“माती नष्ट होण्याच्या धोक्याला मागे टाकण्यासाठी एक शक्ती म्हणून आपण एकत्र आले पाहिजे. मातीच्या समृद्धीमध्येच आपल्या जीवनाचे चैतन्य आहे,” असे सद्गुरूंनी ट्विट केले.

या मोहिमेला मिळत असलेला प्रचंड पाठिंबा आज पुन्हा पाहायला मिळाला, जगभरातील लोक या चळवळीचा संदेश आणखी पसरविण्यासाठी जागतिक मृदा दिनानिमित्त आज पुन्हा एकत्र आले आहेत. माती नामशेष होण्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांच्या संबंधित सरकारांना तातडीने कार्यवाही करण्यासाठी जगभरात 1000 हून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात गेले. भारतात, 100 हून अधिक ठिकाणी ‘माती वाचवा’ संबंधित कार्यक्रम आयोजित केले गेले. APAC प्रदेशात, रेस्टॉरंट्सने FIFA विश्वचषक सामन्यांच्या आधी आणि नंतर ‘माती वाचवा’ व्हिडिओ दाखवले. १८ शहरांमध्ये संसदेसमोर 'माती वाचवा' मेळावे पाहायला मिळाले.

द इकॉनॉमिक्स अँड लँड डिग्रेडेशन (ELD) इनिशिएटिव्ह २०१५ नुसार, आपल्या धरतीवरील ५२% शेतजमिनीवरची माती आधीच खराब झाली आहे आणि उत्पन्न देण्यास असमर्थ आहे. अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) हवामान बदल आणि माती नष्ट झाल्यामुळे २९५० पर्यंत काही प्रदेशांमध्ये पीक उत्पादनात ५०% पर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन, सद्गुरूंनी मार्चमध्ये, युरोप, मध्य आशिया, मध्य पूर्व, यांमध्ये २७ राष्ट्र आणि ११ भारतीय राज्यांमधून १०० दिवसांचा, ३०००० किमीचा एकट्या मोटारसायकलवरून प्रवास केला.

ही लोकचळवळ अल्पावधीतच ३.९१ अब्ज लोकांपर्यंत पोहोचली असून तिला जबरदस्त यश मिळाले आहे. ८१ राष्ट्रे मातीसाठी अनुकूल धोरणे तयार करण्यासाठी वचनबद्ध झाली आहेत. इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्व्हेशन ऑफ नेशन्स (IUCN) आणि युनायटेड नेशन्स (UN) एजन्सी - युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन (UNCCD), वर्ल्ड फूड प्रोग्राम (WFP) आणि इतर अनेक संस्था पर्यावरणीय कारवाईचे नेतृत्व ह्या चळवळीच्या भागीदारीतून पुढे करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com