19व्या वर्षी बनली जगातील सर्वात तरुण चार्टर्ड अकाउंटंट; कोण आहे नंदिनी अग्रवाल?

19व्या वर्षी बनली जगातील सर्वात तरुण चार्टर्ड अकाउंटंट; कोण आहे नंदिनी अग्रवाल?

सीएच्या परीक्षेसाठी अनेक वर्षांची मेहनत आणि सातत्य लागते.
Published on

सीएच्या परीक्षेसाठी अनेक वर्षांची मेहनत आणि सातत्य लागते. मात्र मध्य प्रदेशातील मुरैना येथील नंदिनी अग्रवाल हिने या कठीण वाटेवर अविश्वसनीय यश मिळवत 19व्या वर्षी जगातील सर्वात तरुण महिला चार्टर्ड अकाउंटंट होण्याचा मान मिळवला आहे.

नंदिनीचा जन्म 18 ऑक्टोबर 2001 रोजी झाला. तीने 2021 मध्ये सीएच्या अंतिम परीक्षेत (CA Final – New Course) संपूर्ण देशात पहिला क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली असून, तिच्या सोशल मीडियानुसार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडूनही तिची दखल घेण्यात आली आहे.

नंदिनी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिचे 74000 पेक्षा अधिक फॉलोअर्स असून, यूट्यूबवर दोन लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात. ती अभ्यासाच्या टिप्स, सीए अभ्यासक्रमातील मार्गदर्शन व प्रेरणादायक अनुभव शेअर करत असते.

तिने तिच्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात PwC (PricewaterhouseCoopers) या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये आर्टिकल ट्रेनिंगद्वारे केली. तीन वर्षांच्या कालावधीत तिने स्टॅच्युटरी ऑडिट, ग्रुप रिपोर्टिंग, IFRS असाइनमेंट्स, टॅक्स ऑडिट्स आणि फॉरेन्सिक ऑडिट्स अशा विविध क्षेत्रांमध्ये काम केले. नंतर ती Boston Consulting Group (BCG) या जागतिक सल्लागार कंपनीमध्ये Associate Management Consultant म्हणून कार्यरत होती. येथे ती G20 टीमचा भागही होती. सध्या ती प्रायव्हेट इक्विटी विश्लेषक म्हणून कार्यरत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com