Worli Hit And Run: वरळी हिट अँड रन प्रकरण; मिहीर शहाला शिवडी कोर्टात हजर केलं जाणार

Worli Hit And Run: वरळी हिट अँड रन प्रकरण; मिहीर शहाला शिवडी कोर्टात हजर केलं जाणार

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला आता अटक करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला आता अटक करण्यात आली आहे. वरळीत अपघात घडवल्यानंतर मिहीर शहा लपून राहिला होता. अखेर दोन दिवसांनी आरोपी मिहीर शहाला विरार येथून अटक करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आज मिहीर शहाला शिवडी कोर्टात हजर केलं जाणार आहे. पोलीस मिहीर शहाची पोलीस कोठडी मागणार असल्याची माहिती मिळत आहे.

मिहिर शहासह 12 जणांना वरळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आतापर्यंत ३० ते ३५ जणांची चौकशी या प्रकरणात करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com