Maharashtra Politics : “मुंबई कुठे सरकली का…” मुंबईच्या राजकारणावर फडणवीसांचा वार
Maharashtra Politics : राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून मुंबईत महायुतीने प्रचाराची सुरुवात केली आहे. वरळी येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र मंचावर दिसले. या सभेतून महायुतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला. सभा संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, येणारी निवडणूक मुंबईसाठी निर्णायक ठरणार आहे. मुंबईचा चेहरा बदलण्यासोबतच मुंबईकरांचे जीवन अधिक चांगले करण्याचा निर्धार महायुतीने केला आहे. 16 जानेवारीला मुंबईत महायुतीचा महापौर बसवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
विरोधकांवर टोला लगावत फडणवीस म्हणाले की, निवडणुकीच्या काळात काही जण मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होत असल्याच्या अफवा पसरवतात. मात्र मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याची ताकद कुणातही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळाल्याचंही त्यांनी नमूद केलं. एकनाथ शिंदे यांचं कौतुक करताना त्यांनी सांगितलं की, विचारांचा वारसा कृतीतून मिळतो आणि तो शिंदे यांच्याकडे आहे. सत्ता मिळवण्यापेक्षा मुंबईकरांची सेवा करणे हेच आमचं ध्येय असल्याचा संदेश त्यांनी या सभेतून दिला.
थोडक्यात
राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू
मुंबईत महायुतीने प्रचाराची अधिकृत सुरुवात केली
वरळी येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र मंचावर
या सभेतून महायुतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा
सभा संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी येणारी निवडणूक मुंबईसाठी निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले
मुंबईचा चेहरा बदलण्याचा आणि मुंबईकरांचे जीवन अधिक चांगले करण्याचा निर्धार महायुतीने व्यक्त केला
१६ जानेवारीला मुंबईत महायुतीचा महापौर बसवण्याचं उद्दिष्ट असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले
