पैलवान सिकंदर शेखने मारले विसापूर केसरीचे मैदान : पंजाबच्या पैलवानाला ५ मिनिटात लोळवले
Admin

पैलवान सिकंदर शेखने मारले विसापूर केसरीचे मैदान : पंजाबच्या पैलवानाला ५ मिनिटात लोळवले

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विसापूर येथे झालेल्या विसापूर केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पैलवान सिकंदर शेखची पटकावले.

संजय देसाई, सांगली

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विसापूर येथे झालेल्या विसापूर केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पैलवान सिकंदर शेखची पटकावले. अवघ्या ५ मिनिटात पंजाबचा पैलवान नवजीत सिंगला सिकंदरने मोळी डावावर लोळवत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे पारणे फेडले. 

सिकंदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा आहे. सिकंदरच्या घरात आजोबापासूंनच कुस्तीचा वारसा आहे. वडील रशिद शेख हे देखील पैलवानकी करत होते. सिंकदर वडिलांचे स्वप्न उराशी बाळगून कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत कुस्तीचे धडे गिरवत आहे. सिंकदरने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, विद्यापीठस्तरीय स्पर्धा गाजवल्या आहेत. 

महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेत देशभरात सर्वाधिक चर्चा झालेल्या पैलवान सिकंदर शेखची ५ लाखांची ही कुस्ती होती. राज्यभरातून कुस्ती शौकिनांनी यावेळी उपस्थिती लावली होती. विसापूर येथे यल्लमा देवी यात्रेनिमित्त भारतातील नामवंत मल्लांच्या उपस्थितीत  कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मल्ल कुस्तीसाठी आल्यामुळे या मैदानाला विशेष महत्त्व होते.  या मैदानावर लहान मोठया १५० ते२०० चटकदार कुस्त्या झाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com