दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनाला बसलेल्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
Admin

दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनाला बसलेल्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणारे कुस्तीपटू आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणारे कुस्तीपटू आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली आहे. याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. दिल्लीत जंतरमंतरवर धरणं आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे.

या पार्श्वभूमीवर महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे.कुस्तीपटूंवर पोलिसांनी जीवघेणा हल्ला केल्याचं तसेच वरिष्ठ एसीपी धर्मेंद्र यांनी जंतरमंतरवरुन निघून जाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनाही धमकावल्याचं या पत्रात म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com