दहावी बारावी परीक्षेदरम्यान केंद्राजवळील झेरॉक्स दुकानं बंद ठेवणार

दहावी बारावी परीक्षेदरम्यान केंद्राजवळील झेरॉक्स दुकानं बंद ठेवणार

दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.

दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. यावेळी दहावी- बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे.

राज्य मंडळाच्या दहावी-बारावी बोर्ड परीक्षेत होणाऱ्या कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्स दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. झेरॉक्स सेंटर्समधून मिनी कॉपी पुरवल्या जातात. असे कॉपीचे प्रकार रोखण्याकरता परीक्षा केंद्रातील 100 मीटरपर्यंतच्या परीसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी परीक्षेच्या आधी परीक्षेदरम्यान आणि परीक्षेनंतर कोण कोणती कार्यवाही करावी या संदर्भात राज्यमंडळाने नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक भरारी पथक असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com