ताज्या बातम्या
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना "वाय प्लस" श्रेणीची सुरक्षा
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना काल जीवे मारण्याची धमकी आली होती. वडेट्टीवारांच्या मोबाईलवर त्यांना धमकीचा मॅसेज आला होता.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना काल जीवे मारण्याची धमकी आली होती. वडेट्टीवारांच्या मोबाईलवर त्यांना धमकीचा मॅसेज आला होता. याबाबत वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांच्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी वडेट्टीवार यांच्याशी फोनवर संपर्क केले असून वडेट्टीवार सध्या चंद्रपुरात आहे. तिथून ते परत आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्यांची सुरक्षा वाढवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल अशी माहिती आहे. सध्या वडेट्टीवार यांची सुरक्षा आधी होती तशीच वाय प्लस श्रेणीची आहे.