शिवसेनेनं कबर बचाव अभियान सुरू करावं; भाजपाची टीका

शिवसेनेनं कबर बचाव अभियान सुरू करावं; भाजपाची टीका

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची माहिती मिळत आहे. कबरीवर मार्बल आणि LED लाईट्स लावण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मुंबई बॉम्बस्फोटातला दहशतवादी याकुबची कबर सजवण्यामागे महाविकास आघाडीचा हात असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची माहिती मिळत आहे. कबरीवर मार्बल आणि LED लाईट्स लावण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मुंबई बॉम्बस्फोटातला दहशतवादी याकुबची कबर सजवण्यामागे महाविकास आघाडीचा हात असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

आम्ही याचा निषेध करत आहोत. ज्यांनी हा देशद्रोही गुन्हा केला त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी मागणी करत आहे. भाजप सरकारला विनंती करत आहे की सरकारने तातडीने सुशोभिकरणं केले त्यांना शोधून काढावे. हे गंभीर प्रकरण आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडणार नाही मग हे कसं केलं. याचा शोध लागला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी हे कॉम्प्रमाईज का केलं याचे उत्तर द्यायला हवे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

यासोबतत बावनकुळे म्हणाले की, देशद्रोही याकूब मेननच्या कबरीवर जे काही कोरोना काळात सौंदर्यीकरणं झाले. उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ नव्हता. अशावेळी याकूब मेनन याच्या कबरीला अलिखित परवागनगी दिली. त्याचा निषेध राज्यभर होत आहे. उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व त्यांनी सरकारसाठी किती अॅडजस्ट केले हे यातून स्पष्ट होते. तसेच तेव्हाच्या गृहमंत्री यांनी काय केलं? राज्याचे मुख्यमंत्री गप्प का बसले? त्यांना खुर्ची टिकवण्यासाठी हे करावे लागले का? ज्याने मुंबईला छिन्न विच्छिन्न केले त्याची कबर सुशोभित करणे तिला सजवणे योग्य नाही. सरकार कारवाई करेल पण ही घटना उद्धव ठाकरे यांच्या काळात घडली. त्यामुळे यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई व्हावी. राज्याच्या जनतेची माफी उद्धव ठाकरे यांनी मागावी. मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी अनेक घटनांचे समर्थन केले असे कबूल केलं पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com