Yamini Jadhav : प्रचाराला कमी दिवस असले तरी आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहचलेलो आहोत

Yamini Jadhav : प्रचाराला कमी दिवस असले तरी आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहचलेलो आहोत

दक्षिण मुंबईमधून महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी काल उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आजपासून प्रचाराला सुरुवात केली.
Published by :
Siddhi Naringrekar

दक्षिण मुंबईमधून महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी काल उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आजपासून प्रचाराला सुरुवात केली. यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत होताना पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर यामिनी जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामिनी जाधव म्हणाल्या की, प्रचाराला कमी दिवस असले तरी आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहचलेलो आहोत.

वरळीकर लोकांना आज मी आज भेटायला आलेलं आहे. मी स्वत: वरळीकर आहे. माझ्या लोकांच्या सोबतीने प्रचाराला पुढ नेणं. हे माझं काम आहे. हे शक्तीप्रदर्शन नाही आहे हा महायुतीवरचा, पंतप्रधान माननीय मोदी साहेबांवरचा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरचा, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांवरचा, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांवरचा, रामदास आठवले साहेबांवरचा, राज साहेबांवरचा विश्वास आहे. असे यामिनी जाधव म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com