राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी यामिनी माध्यमांशी बोलताना यामिनी जाधव म्हणाल्या की, राज साहेबांचे आशीर्वाद घ्यायला आम्ही इथं आलो होतो. आपल्याला जसं माहित आहे की, महायुतीमध्ये राजसाहेबसुद्धा आहेत. त्यांच्या शुभेच्छा घ्यायला आलो. ते पूर्णपणे आमच्या पाठिशी उभे आहेत. एवढी त्यांनी ग्वाही दिलेली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com