Yashomati Thakur : भिती नव्हती तर मारकडवाडीमध्ये त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान का होऊ दिलं नाही?

Yashomati Thakur : भिती नव्हती तर मारकडवाडीमध्ये त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान का होऊ दिलं नाही?

महायुतीचा शपथविधी सोहळा काल पार पडला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महायुतीचा शपथविधी सोहळा काल पार पडला. मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. महायुतीचा शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, त्यांचे अभिनंदन, त्यांनी महाराष्ट्र जपावा, महाराष्ट्र धर्म त्याठिकाणी सांभाळावा. अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. महाराष्ट्र धर्माला जर तडा गेला तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. मारकडवाडीमध्ये त्यांनी बॅलेट पेपरवर का मतदान होऊ दिलं नाही.

जर यांना भिती नव्हती तर त्यांनी मारकडवाडीमध्ये मतदान होऊ दिलं पाहिजे होते. राहुलजी या देशाच्या सुरक्षिततेसाठी, लोकशाहीच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरतील तर आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहोत. असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com