"भगवा परिधान करून करून खालच्या दर्जाच वक्तव्य अशोभनिय" यशोमती ठाकूर यांची रामदेव बाबांवर सडकून टीका

"भगवा परिधान करून करून खालच्या दर्जाच वक्तव्य अशोभनिय" यशोमती ठाकूर यांची रामदेव बाबांवर सडकून टीका

महिला साडीमध्ये चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे खळबळजनक वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले आहे.

महिला साडीमध्ये चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे खळबळजनक वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले आहे. यावर राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांनी रामदेव बाबा यांच्यावर सडकून टीका केली आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, रामदेव बाबा यांच वक्तव्य न शोभनार आहे. भगवा परिधान करून खालच्या दर्जाच वक्तव्य अशोभनिय आहे. देशात व राज्यात खूप विषय आहे या सगळ्या गोष्टीवर पडदा टाकण्यासाठी व समाजाला विचलित करण्यासाठी हे विचीत्र वक्तव्य रामदेव बाबा करत आहे. रामदेव बाबाला भगवा परिधान करून असं घाण बोलण्याची परवानगी कोणी दिलेली नाही अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली.

काय म्हणाले होते रामदेव बाबा?

साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबा बोलले होते.

"भगवा परिधान करून करून खालच्या दर्जाच वक्तव्य अशोभनिय" यशोमती ठाकूर यांची रामदेव बाबांवर सडकून टीका
काही नाही घातलं तरी महिला चांगल्या दिसतात; रामदेव बाबांचे खळबळजनक वक्तव्य
Lokshahi Marathi
www.lokshahi.com