बातम्या
वीज कनेक्शन कट केले तर अधिकाऱ्यांना झोडा; यशोमती ठाकूर
यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पाणीटंचाइचा आढावा घेतला.
यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पाणीटंचाइचा आढावा घेतला. यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, वीज कनेक्शन तोडण्यासाठी अधिकारी आले तर त्यांना तिथेच झोडा असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही, तर शेतकऱ्यांच्या विजेला हात लावू नका. असे त्यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांची वीज कट करू नका, हे निर्दयी सरकार आहे. तुम्ही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कसे काय कट करत आहात? असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन कट केल्याबाबतची तक्रार यशोमती ठाकूर त्यांच्याकडे केली असता त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.