Yashwant Jadhav
Yashwant Jadhavteam Lokshahi

यशवंत जाधवांच्या अडचणीत वाढ; आयकर विभागाकडून ४१ मालमत्ता जप्त

यशवंत जाधव यांच्या मेहुण्या आणि भाच्याला देखील समन्स
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

शिवसेना नेते व महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्याशी संबंधित मालमत्तांवर टाच आणली आहे. यशवंत जाधव यांच्याशी संबंधित ४१ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात भायखळ्यातील ३१ फ्लॅट्स आणि वांद्रेतील ५ कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे.

यशवंत जाधव हे गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाच्या रडारवर होते. काही दिवसांपूर्वीच जाधव यांच्या घरी आणि मालमत्तांवर छापे टाकले होते. या छाप्यात त्यांनी मिळालेल्या माहितीनंतर आचा जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभागाने भायखळ्यातल्या बिलखाडी चेम्बर्स या इमारतीतील ३१ फ्लॅट्स आणि वांद्रे इथल्या ५ कोटी रुपये किंमतीच्या एका फ्लॅटचा समावेश आहे.

२०१८ ते २०२२ मध्ये जाधव स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी या मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आयकर विभागाला आहे. तसंच, आयकर विभागाने जाधव यांचे मेहुणे विलास मोहिते आणि पुतण्या विनीत जाधव यांना समन्स बजावले आहेत. तसंच, त्याचे स्टेटमेंटही रेकॉर्ड केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com