यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरात गणेश मुर्त्यांसह मातीही गेली वाहून

यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरात गणेश मुर्त्यांसह मातीही गेली वाहून

शहरात अनेक भागात पाणी शिरल्यामुळे गृह उपयोगी साहित्य वाहून गेले.
Published by  :
Team Lokshahi

संजय राठोड, यवतमाळ

जिल्ह्यात गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अर्धे यवतमाळ शहर पाण्यात होते. शहरात अनेक भागात पाणी शिरल्यामुळे गृह उपयोगी साहित्य वाहून गेले. त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले आहे. अतिवृष्टीची झळ सर्वसामान्यांसह शहरातील मूर्तिकारांना देखील बसली आहे. पुराने गणेश मूर्त्यांसह माती वाहून गेल्यामुळे गणेश मूर्तिकार हवालदिल झाले आहे.

खंडी पूल, बेंडकी पूरा, भारत सेवा आखाडा, या भागात मोठ्या प्रमाणात मूर्तिकार वास्तव्यास आहे. आगामी गणेशोत्सव व गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांकडून श्रीकृष्ण व गणेश मुर्त्या बनविण्याचे कार्य सुरू होते. अशातच अतिवृष्टीने या मूर्तिकारांची अक्षरशः झोप उडवली. अनेकांच्या गणेश मुर्त्या या पुराच्या पाण्यात विरघळून गेल्या. तर काहींची लाल माती या पुराने वाहून गेली. यामध्ये मूर्तिकार सुजित मोरवाल, रवी मोरवाल, अजय मसराम,अजय धुमोने, यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com