आज विदर्भात पावसाचा 'यलो' अलर्ट

आज विदर्भात पावसाचा 'यलो' अलर्ट

राज्यात पावसाने जोर वाढवला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे.

राज्यात पावसाने जोर वाढवला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. आजही हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे

राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.मागील तीन ते चार दिवसात राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले भरुन वाहत आहेत.

यलो अलर्ट म्हणजे हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.

Lokshahi
www.lokshahi.com