Pune Swargate Case| मुख्य आरोपी काही तासात पकडला जाईल; योगेश कदम यांचा दावा

Pune Swargate Case| मुख्य आरोपी काही तासात पकडला जाईल; योगेश कदम यांचा दावा

पुणे स्वारगेट प्रकरणात मुख्य आरोपी काही तासात पकडला जाईल, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा दावा. घटनास्थळी पाहणी करत पोलिसांशी चर्चा.
Published by :
shweta walge
Published on

पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकामध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराबद्दलचे अनेक पडसाद उमटताना दिसत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. आज राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच पोलिसांशी चर्चा करून घटनेचा आढावा घेतला आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर भाष्य केले.

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. एसटी महामंडळाच्यावतीने खासगी सुरक्षा रक्षक नेमले जातात. पोलिसांकडून नियमितपणे गस्त घालण्यात येते. घटनेच्या दिवशीदेखील गस्त घालण्यात आली होती. पोलिसांनी गस्त घातली, कुठलंही दुर्लक्ष पोलिसांनी केले नसल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी सावध होऊ नये यासाठी पोलिसांकडून या प्रकरणी गुप्तता पाळण्यात आली असल्याचे सांगत त्यांनी प्रकरण लपवण्याच्या आरोपावर पोलीस अधिकाऱ्यांची पाठराखण केली.

योगेश कदम यांनी सांगितले की, ही घटना घडली त्यावेळी शिवशाही बसच्या आजुबाजूला 10 ते 15 लोक होते. पण तरुणीने विरोध न केल्याने कोणालाही शंका आली नाही. तरुणीकडून आक्रमक कृती झाली असती तर कदाचित ही घटना घडली नसती. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर येतील असेही योगेश कदम यांनी नमूद केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com