ट्वीटरवर योगी आदित्यनाथ ट्रेंडिंग; #Yoginomics हॅशटॅग होतोय ट्रेंड

ट्वीटरवर योगी आदित्यनाथ ट्रेंडिंग; #Yoginomics हॅशटॅग होतोय ट्रेंड

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशात उद्योग यावेत म्हणून मुंबईतील काही उद्योगपतींशी ते चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशात उद्योग यावेत म्हणून मुंबईतील काही उद्योगपतींशी ते चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर महाविकास आघाडीकडून आरोप केले जातात. याच पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले की, “मुंबई ही मुंबई आहे. हे शहर अर्थभूमी आहे. तर उत्तर प्रदेश राज्य हे धर्मभूमी आहे. या दोघांचा सुंदर संगम होऊ शकतो. मुंबईतील फिल्मसिटी घेऊन जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. मात्र आम्ही आमची स्वत:ची फिल्मसिटी उभारत आहोत,” असे त्यांनी सांगितले.

यासर्व योगी आदित्यनाथांच्या दोऱ्यावरुन आता ट्वीटरवर योगी आदित्यनाथ ट्रेंडिंग होत आहेत. #Yoginomics हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होत आहे. दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर असलेले यूपीचे मुख्यमंत्री योग्य आदित्यनाथ सध्या ट्विटर वरती जबरदस्त ट्रेंड होत आहेत. हिंदुत्त्ववादी प्रतिमा असलेल्या योगींच्या अर्थनितीवरून ते ट्रेंडिंग आहेत.

सुमारे १० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट बाळगलेल्या योगींना मुंबईत गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त मिळत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यातील अवघ्या एका दिवसात उत्तर प्रदेशमध्ये १७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास उद्योजक तयार झाल्याचा दावा उत्तर प्रदेश प्रशासनाने केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com