Sanjay Raut Nashik : स्वातंत्र्यदिनी मांसाहारावर बंदी प्रकरणी राऊतांचा फडणवीस सरकारवर निशाणा, म्हणाले की....
Ban on sale of meat in Malegaon on Independence Day : 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन तसेच आगामी हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील कत्तल खाने,मांस,मटण विक्रीची दुकानें बंद ठेवण्याचा आदेश आयुक्त रवींद्र जाधव यांनी काढला आहे. आता कल्याण डोंबिवली पाठोपाठ आता नाशिकमध्ये मालेगाव महानगरपालिकेनेही हा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, "स्वातंत्र्यदिनी मांसाहारात नाही तुम्ही नका खाऊ तुम्ही सगळे लपवून खात आहात. मग लोकांवरती हे बंदी का प्रत्येक प्रकारची बंदी हे खाऊ नका ते खाऊ नका हा हे बोलू नका ते बोलू नका. फडणवीसांचे सरकार गुवहाटीमध्ये बकरी, कोंबड्या कापून खात होते. त्या सरकारला मांस- मच्छीचा तिटकार का येतोय? यांचा मला आश्चर्य वाटतंय. फडणवीस सरकारने थोतांडशाही बंद करा."