Chandrashekhar Bawankule : हिंदुत्वापासून तुम्ही दूर गेलेत!’; बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Chandrashekhar Bawankule : हिंदुत्वापासून तुम्ही दूर गेलेत!’; बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणाChandrashekhar Bawankule : हिंदुत्वापासून तुम्ही दूर गेलेत!’; बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Chandrashekhar Bawankule : हिंदुत्वापासून तुम्ही दूर गेलेत!’; बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

खोट्या प्रमाणपत्रांवर कारवाईची हमी, ओबीसींच्या चिंतेवर सरकार गंभीर
Published by :
Team Lokshahi
Published on

सह्याद्री अतिथीगृहावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे, अतुल सावे, विजय वड्ट्टीवार यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. ओबीसी व मराठा समाजातील आरक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर जवळपास दोन तास सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन चर्चेचा आढावा दिला आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

ओबीसींच्या चिंता ऐकून घेतल्या ,

बावनकुळे म्हणाले, “ओबीसी शिष्टमंडळाकडून ४० पदाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. महाज्योतीला निधी, ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहे, उद्योगांसाठी सवलतीचे कर्ज, आणि अलीकडील जीआरमुळे निर्माण झालेला संभ्रम या सर्व विषयांवर चर्चा झाली. काही अधिकाऱ्यांनी ‘मराठा-कुणबी’ प्रमाणपत्र देताना गैरप्रकार केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, कुणीही खोटं प्रमाणपत्र काढलं, दाखल्यांत खोडतोड केली, तर संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होईल. कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, आणि ओबीसीच्या ताटातल कुणी काही घेणार नाही, हे सरकार हमखास पाहणार आहे.”

‘श्वेतपत्रिका’ची मागणी – तपास समिती सक्रिय

बैठकीत मंत्री पंकजा मुंडे यांनी काही अधिकाऱ्यांकडून खोटे जातप्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणांवर ‘श्वेतपत्रिका’ काढावी, अशी मागणी केली. यावर बावनकुळे म्हणाले, “ओबीसी उपसमिती सर्व जिल्ह्यांकडून तपशीलवार माहिती मागवेल. कुठल्या तहसीलदारांनी, प्रांताधिकाऱ्यांनी कोणती प्रमाणपत्रे दिली आहेत, याची तपासणी केली जाईल. जर खोडतोड झाल्याचे निदर्शनास आले, तर शासन योग्य ती कारवाई करेल. लहान प्रमाणावर प्रकरणे असतील, तर चौकशी समितीद्वारे ती हाताळली जातील. मात्र मोठ्या प्रमाणावर चुकीची प्रमाणपत्रे सापडली, तर त्यासाठी स्वतंत्र श्वेतपत्रिका काढली जाऊ शकते.”

१० ऑक्टोबरचा मोर्चा मागे घ्या – मुख्यमंत्रींची विनंती

ओबीसी संघटनांनी १० ऑक्टोबरला जाहीर केलेला मोर्चा रद्द करण्याचीही विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. “राज्यातील पूरस्थिती आणि शेतकऱ्यांची बिकट अवस्था लक्षात घेऊन शासनाला स्थैर्य हवे आहे. सरकार ओबीसी समाजाशी संवादासाठी नेहमी तयार आहे, त्यामुळे संघर्षाची गरज नाही,” असे बावनकुळे यांनी सांगितले.

त्यांनी स्पष्ट केले की, “ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष होऊ नये, हीच आमची प्राथमिकता आहे. सरकार न्याय देईल. दोन्ही समाज एकमेकांविरुद्ध उभे राहणार नाहीत.”

‘खोट्या प्रमाणपत्रांना आळा; कोर्टाचा निकाल निर्णायक’

बावनकुळे म्हणाले, “खोट्या प्रमाणपत्रांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. काही जणांनी जन्मदाखले, वंशावळी यांमध्ये खोडतोड केली आहे. काही दाखले महसूल विभागाच्या नोंदीत बदल करून सादर झाले. हे गंभीर प्रकरण आहे. यावर ओबीसी सब-कमिटी चौकशी करेल. २ सप्टेंबरच्या जीआरवर काही याचिका दाखल झाल्या आहेत. आता पाच ऑक्टोबरला हायकोर्टात सुनावणी आहे. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत जीआरमध्ये कोणताही बदल करता येणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं; पाकिस्तानचे झेंडे त्यांच्या सभेत’

बैठकीनंतर पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांच्या पुण्यातील सभेचा उल्लेख करत विचारले की, “उद्धव ठाकरे म्हणतात, आम्ही भाजपासोबत नसल्याने आम्ही हिंदुत्व सोडलं का?”

यावर बावनकुळे यांनी प्रखर शब्दांत उत्तर दिले,

“कडवटपणा तर उद्धव ठाकरेंनीच घेतला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ठाकरे यांच्या प्रत्येक सूचनेचा सन्मान झाला. पण मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनीच भाजपचा विश्वासघात केला. आज तर उद्धव ठाकरेंच्या सभेत पाकिस्तानचे झेंडे फडकवले जात आहेत. ही भूमिका हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या व्यक्तीची कशी असू शकते?”

ते पुढे म्हणाले,

“स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान काँग्रेस आणि राहुल गांधी करत असताना, उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत बसतात. हे हिंदुत्वापासून दूर जाण्याचेच लक्षण आहे. आज ते काँग्रेसच्या मांडीवर बसले आहेत आणि हिंदुत्वाची व्याख्या करतात, हे महाराष्ट्र विसरणार नाही. हिंदुत्ववादी जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवली आहे, आणि येणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्येही दाखवेल.”

‘महायुती पुन्हा बहुमताने येईल’

बावनकुळे यांनी विश्वास व्यक्त केला की, “महायुतीचा जनाधार वाढत आहे. पुढील नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुती ५१ टक्के मतदान मिळवून प्रचंड बहुमताने विजयी होईल. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं, हिंदुत्वापासून खरं तर तेच दूर गेले आहेत, भाजप नव्हे.”

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com