Mumbai Auto Driver : नवलचं! रिक्षा चालक असून देखील दरमहा करायचा5 लाखांच्यावर कमाई
मुंबई मधून एक मोठी बातमी समोर आलेली आहे, रिक्षा चालकाकडे तब्बल 5 लाखांपेक्षा जास्त पैसे मिळालेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्याने हे पैसे रिक्षा न चालवता कमावले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा रिक्षा चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. एका व्यक्तीने याबाबत लिंकइन पेजवर माहिती सांगितली त्यावरून हा प्रकार उघडकीस आला.
राहुल रूपाणी हे व्यक्ती अमेरिकेत दुतावासामध्ये आपल्या व्हिसाच्या कामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना आलेला अनुभव त्यांनी लिंकइनवर शेअर केला होता. जेव्हा ते अमेरिकेत दूतावासामध्ये व्हिसाच्या कामासाठी गेले. तेव्हा तेथील सुरक्षारक्षकांनी त्यांना त्यांच्याकडे असलेली बॅग आतमध्ये घेऊन जाता येणार नाही असं सांगितलं. त्याचवेळेला त्यांच्याकडे एक रिक्षा चालक आला आणि त्यांनी सांगितले की मी तुमची बॅग व्यवस्थित ठेवतो त्या बदल्या तुम्ही मला हजार रुपये द्या.
सुरुवातीला राहुल रूपाणी यांना याबाबत थोडी शंका आली, पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांनी त्याच्याकडे ती बॅग ठेवण्यासाठी दिली. असं त्यांनी सांगितले. अशाप्रकारे दिवसभरामध्ये तो रिक्षाचालक वीस ते तीस ग्राहकांच्या बॅग स्वतःकडे ठेवुन त्याद्वारे दरमहा 5 ते 8 लाख रुपये ते कमवतात अशा आशयाची पोस्ट राहुल रूपाणी यांनी लिंक इन वर व्हायरल केली.
ती मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचली आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत त्या रिक्षा चालकासह एकूण 12 जणांना अटक केली. अशा प्रकारच्या सेवेमुळे सामान्य नागरिकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. रिक्षाचालकांना अशा प्रकारे बॅग स्वतःकडे ठेवण्याची परवानगी नसल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.