मुंबईत पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू
Admin

मुंबईत पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू

मुंबईत सुरू असलेल्या पोलीस भरतीप्रक्रियेमध्ये 26 वर्षीय उमेदवाराचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत सुरू असलेल्या पोलीस भरतीप्रक्रियेमध्ये 26 वर्षीय उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. गणेश उत्तम उगले असं या उमेदवाराचं नाव आहे.वाशिमचा रहिवाशी असलेला गणेश पोलीस भरतीसाठी मुंबईला आला होता. पोलीस भरतीची परीक्षा सुरू असतानाच त्याला अचानक भोवळ आली आणि तो मैदानातच कोसळला.

शुक्रवारी पोलीस भरती परीक्षेतंर्गत उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू होती. त्यावेळी 1600 मीटर धावण्याची शर्यत घेतली जात होती. गणेशनं आपली 1600 मीर धावण्याची शर्यत पूर्ण केली आणि तेवढ्यात त्याला भोवळ आली. तो मैदानातच कोसळला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

17 फेब्रुवारी रोजी कलिना इथल्या कोळे कल्याण मैदानात उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येत होती. त्याचवेळी या भरतीसाठी आलेल्या 26 वर्षीय गणेश उत्तम उगले हा उमेदवार 1600 मीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण होण्यापूर्वीच चक्कर येऊन जमिनीवर पडला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com