पोलिसांच्या चुकीच्या कारवाईमुळे तरुणाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
प्रसाद पाताडे|सिंधुदुर्ग: गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणारी पकडण्यात आलेली आलिशान गाडी सोडून देत त्या ऐवजी दुसऱ्या गाडीवर कारवाई करणाऱ्या बांदा पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी कोलगाव येथील सुमेध गावडे या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. दरम्यान या ठिकाणीही आपल्याला न्याय न मिळाल्याने आता आपण कोकण परिक्षेत्रिय पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाला बसणार असल्याचे सांगत तेथेही न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा देखील सुमेध गावडे याने दिला आहे.
जुलै २०२२ मध्ये बांदा पोलिसांनी गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणारी एक आलिशान कार पकडली होती. मात्र ती कार लगेच सोडण्यात आली. मात्र त्या आलिशान कार ऐवजी त्या ठिकाणी दुसरी कार दाखवून कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप सुमेध गावडे यांनी केला आहे. यासाठी गावडे यांनी १५ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत अवैध दारू वाहतूक करणारी पकडण्यात आलेली आलिशान गाडी सोडून देत त्या ऐवजी दुसऱ्या गाडीवर कारवाई करणाऱ्या बांदा पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती.
यावेळी जिल्हा दुसऱ्यावर असलेले मंत्री दीपक केसरकर यांनी यावर योग्यता कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच कोकण परीक्षेत्रिय पोलीस महानिरीक्षक यांनीही याबाबत योग्यता कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. मात्र त्या प्रकरणावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे सुमेध गावडे यांनी आज पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान या ठिकाणीही आपल्याला न्याय न मिळाल्याने आता आपण कोकण परिक्षेत्रिय पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाला बसणार असल्याचे सांगत तेथेही न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा देखील सुमेध गावडे याने दिला आहे.
सुमेध गावडे यांनी आपल्याला न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. त्यामुळे आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ऐवजी पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.