ताज्या बातम्या
"तुमचे विचार घाण...", म्हणत सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहबादियाला फटकारलं
या सगळ्या प्रकारामुळे रणवीर अलाहबादिया चांगलाच कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.
प्रसिद्ध युट्यूबर समय रैनाचा वादग्रस्त शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' शो हा चांगलाच चर्चेत राहीली आहे. काही दिवसांपूर्वी रणवीर अलाहबादियाने आई-वडिलांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या सगळ्या प्रकारामुळे रणवीर अलाहबादिया चांगलाच कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. त्याच्यावर विविध गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणी रणवीरने सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. आता त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे.
आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला फटकारलं आहे. "समाजाची काही मूल्य असतात. ती पायदळी तुडवली आहेत. तुमच्या डोक्यातील घाणेरडे विचार शोमध्ये दिसले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बोलण्याची परवानगी तुम्हाला नाही".