Zeeshan Siddique : विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी इच्छूक?

विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी इच्छूक असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अनेकजण या जागेसाठी इच्छुक आहेत. 27 मार्चला विधानपरिषदेसाठी पाच जागांसाठी मतदान होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी इच्छूक असल्याची माहिती मिळत आहे. झिशान सिद्दीकीसाठी बॉलिवूडमधून राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रचंड दबाव असल्याच्या चर्चा आहेत.

सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना अभिनेता सलमान खानसह बॉलीवूडमधील अभिनेते अभिनेत्रींचे फोन येत असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com