ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावर पंढरपुरात झिका व्हायरसचा शिरकाव

ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावर पंढरपुरात झिका व्हायरसचा शिरकाव

येत्या 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अभिराज उबाळे, पंढरपूर

येत्या 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. यात्रेसाठी राज्यासह परराज्यातून सुमारे सात ते आठ लाख भाविक येतील असा अंदाज आहे. यात्रेची तयारी सुरू असतानाच कोल्हापूर, पुणे नंतर पंढरपूर शहरातील एका व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. डेंग्यू आजारात जी लक्षणे दिसून‌ येतात तशीच झिका व्हायरसच्या आजाराची लक्षण आहेत.

झिका व्हायरस हा जीवघेणा आजार असल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. ताप येणं, डोकं दुखी आणि मळमळणे अशी‌ झिका आजाराची प्राथमिक लक्षणं दिसू येतात. प्रामुख्याने डासांच्या मार्फत हा आजार पसरतो. त्यामुळे जिल्हा हिवताप विभागाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात धुळ फवारणी सुरू केली.

या शिवाय लोकांमध्ये या आजाराविषयी जनजागृती केली जात आहे. बाधीत परिसरात हिवताप विभागाने कंटेनर सर्व्हे केला असून चार जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. याच परिसरातील गरोदर महिलांची तपासणी सचरूह केली आहे. पंढरपूर शहरातील मठ, मंदिरे, धर्मशाळा या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा हिवताप विभागाने केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com