Ajit Pawar : अजित पवारांच्या खुदा हाफीज 'या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिंतूरमध्ये झालेल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या ‘खुदा हाफीज’ या शुभेच्छावाक्याची सध्या जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे .राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिंतूरमधील सभेत जोरदार भाषण करत महायुती सरकारचा विकासदृष्टिकोन, स्थानिक प्रश्न आणि आगामी निवडणुकीतील पक्षाची रणनीती स्पष्ट केली. सर्व समाज, सर्व धर्म आणि सर्व जातींना सोबत घेऊन विकास साधण्याची परंपरा आपल्या पक्षाची असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबण्याचे आवाहन केले.
भावनिक स्वरात अजित पवार म्हणाले, “आम्ही कधीच एका समाजासाठी काम केले नाही. जिंतूरला आज धर्मनिरपेक्ष चेहरा हवा आहे आणि तो तुम्ही कायम स्वीकारला आहे." जिंतूरच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने मतदान करा. खुदा हाफीज… सभेचा शेवट करताना अजित पवारांनी जोरदार आवाहन केले. परंतु खुदा हाफीज… या शब्दामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
