omicron variant | मुंबई विमानतळावर आलेल्या 485 परदेशी प्रवाशांपैकी 9 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

omicron variant | मुंबई विमानतळावर आलेल्या 485 परदेशी प्रवाशांपैकी 9 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

Published by :
Published on

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रोन (Omicron) या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट पुन्हा एकदा देशाची चिंता वाढवली आहे. ओमायक्रोनचा संसर्ग इतर देशांमध्ये पसरताना दिसत आहे. कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक संसर्गजन्य असू शकतो असा दावा तज्ज्ञांचा आहे. कोरोना विषाणूचे नवीन ओमायक्रोन व्हेरिएंट जगासमोर एक नवीन समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत मुंबई विमानतळावर आलेल्या 485 प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 9 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंग व एस जिन चाचण्या केल्या जाणार आहेत.

ओमायक्रॉनचा प्रसार झपाट्याने होत असल्याने केंद्र सरकारने देशात येणाऱ्या परदेशी प्रवाशांच्या चाचण्या करण्याच्या तसेच, त्यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मुंबई विमानतळावर गेल्या १५ ते २० दिवसांत जे प्रवासी परदेशातून आले आहेत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे . १० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान ४० देशांतून २ हजार ८६८ प्रवासी मुंबईमध्ये आले आहेत. या सर्वांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी ४८५ प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग तसेच, एस जिन चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

पॉझिटिव्ह प्रवासी –

1. लंडन येथून 10.11.2021 ला आलेला 21 वर्षीय पुरुष

  1. मोरीशियस येथून 25.11.2021 ला आलेला 47 वर्षीय पुरुष
  2. साऊथ आफ्रिका येथून 25.11.2021 ला आलेला 39 वर्षीय पुरुष
  3. लंडन येथून 1.12.2021 ला आलेला 25 वर्षीय पुरुष
  4. लंडन येथून 17.11.2021 ला आलेला 66 वर्षीय पुरुष
  5. पोर्तुगाल येथून 25.11.2021 ला आलेला 69 वर्षीय पुरुष
  6. लंडन येथून 13.11.2021 ला आलेला 34 वर्षीय पुरुष
  7. लंडन येथून 2.12.2021 ला आलेला 44 वर्षीय पुरुष
  8. जर्मनी येथून 2.12.2021 ला आलेला 38 वर्षीय पुरुष
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com