सांगलीच्या मिरजेत गणपती विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच
संजय देसाई, सांगली
दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना काल निरोप देण्यात आला. बाप्पाची सेवा केल्यानंतर काल थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले गेले.
सांगलीच्या मिरजेतील विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. 24 तास उलटून गेले तरी विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत. काल सकाळपासून गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका धुमधडाक्यात सुरू झाल्या. अजूनही मिरवणुका सुरुच आहेत.
मिरज शहरातल्या अडीचशे सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पांचं विसर्जन पार पडत आहे. मोठ्या मुर्त्या असल्याने विसर्जनास वेळ लागत असल्याने अद्यापही बाप्पाचे विसर्जन सुरू असलेलं पाहायला मिळत आहेत.
पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य दिव्य अशी गणपती मिरवणूक सुरू आहे. या विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी अनेक गणेश भक्तांनी गर्दी केली असून शहरातल्या गणेश तलाव सह कृष्णा घाटावरील कृष्णा नदी पात्रामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.