Lalbaugcha Raja 2024 : पुढच्या वर्षी लवकर या! लालबागच्या राजाला भक्तीभावानं निरोप

Lalbaugcha Raja 2024 : पुढच्या वर्षी लवकर या! लालबागच्या राजाला भक्तीभावानं निरोप

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. पाणावलेल्या डोळ्यांनी लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी मोठी गर्दी केली होती. जल्लोषात, उत्साहात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

लालबागचा राजा मंगळवारी सकाळी 11 वाजता मंडपातून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला होता. आरती करुन लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. बाप्पाची मिरवणूक तब्बल 23 तास सुरू होती.

गिरगाव चौपाटीच्या परिसरात गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त गिरगाव चौपाटीवर जमले होते. ही शान कोणाची लालबागच्या राजाची, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.

भरल्या डोळ्यांनी भक्तांनी आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला निरोप दिला. दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पानं भक्तांचा निरोप घेतला. लालबागच्या राजाला साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी भक्तांची अलोट गर्दी होती. गिरगाव चौपाटीवर अनेक गणपतींचं विसर्जन पार पडलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com