हे आहेत उन्हाळ्यात काकडी खाण्याचे फायदे...
सध्या एप्रिल महिन्यातच होऊन प्रचंड जाणवत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व भागांमध्ये उन्हाचा पारा (temperature)हा जवळजवळ 40 अंशांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यामुळे या कडाक्याच्या उन्हामध्ये रसदार फळांचे सेवन हे आरोग्यास हितकारक ठरते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे काकडी, टरबूज अशा फळांचे सेवन या दिवसात फायद्याचे ठरते.
काकडी म्हणजे उन्हाळ्यात आवर्जून खाल्ले जाणारे सलाड. पाण्याचा अंश सर्वाधिक असलेली काकडी म्हणजे भर उन्हात शरीराला थंडावा देणारी गोष्ट. गारेगार गोड काकडी मीठ आणि थोडंस तिखट लावून कराकरा खायला जी मजा येते ती इतर कशातच नाही. कार्बोहायड्रेटस आणि कॅलरीजचे कमी प्रमाण यामुळे काकडी खाल्ल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. काकडीमध्ये असणारे पोटॅशियम, फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हीटॅमिन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगनीज हे घटक चांगल्या प्रमाणात असतात. (Summer Special) त्यामुळे काकडी खाणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असते.
हल्ली उच्च रक्तदाब ही अतिशय सामान्य समस्या झाली आहे. कमी वयात उच्च रक्तदाबाचा त्रास होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काकडीमध्ये असणारे फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या घटकांमुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्याच बरोबरीने काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेट राहण्यासाठी ज्याप्रमाणे काकडी खाणे फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी काकडी उपयुक्त असते. काकडीचे पाणी चेहऱ्यावर लावणे, डोळ्यांवर काकडीच्या चकत्या ठेवणे. यामुळे त्वचेला गार तर वाटतेच, पण त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.