iPhone 12
iPhone 12Team Lokshahi

iPhone 12 खरेदी करण्याची मिळतेय सुवर्णसंधी, एवढ्या रूपयांपेक्षा जास्त सूट

iPhone 12 खरेदी करण्याचा विचार करताय तर लगेच तयार व्हा. अॅपलचा हा दोन वर्षे जुना आयफोन फ्लिपकार्टवरून १२००० रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह घेता येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

iPhone 12 खरेदी करण्याचा विचार करताय तर लगेच तयार व्हा. अॅपलचा हा दोन वर्षे जुना आयफोन फ्लिपकार्टवरून १२००० रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह (discount) घेता येणार आहे. फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक्स डेज सेलचे ६ ते १० जुलै दरम्यान पाच दिवस आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये iPhone 12 वर डिस्काउंट आणि बँक ऑफर्स (bank offers) मिळत आहेत.

ऑफर अशी की, iPhone 12 चा ६४ GB व्हेरिएंट सध्या Flipkart वर ५४,९९९ रुपयांना लिस्ट झाला आहे. फोनवर १०,९०१ रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय सिटी क्रेडिट आणि डेबिट कार्डने फोन खरेदी केल्यास १० टक्के (१,००० रुपयांपर्यंत) सूट मिळेल. Citi क्रेडिट कार्ड EMI ट्रांजेक्शनवर १,२५० रुपयांपर्यंत सूट असेल. अशा प्रकारे, तुम्ही १२ हजार रुपयांपेक्षा जास्त सूट देऊन iPhone 12 घेऊ शकता.

iPhone 12 च्या १२८ GB स्टोरेज असून हा फोन ५९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर ६९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

iPhone 12 ची किंमत साधारणपणे ६५,९०० रुपयांपासून सुरू होते. पण सध्या ६४ GB स्टोरेजसह iPhone 12 चा बेस व्हेरिएंट ५४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय तुम्हाला बँक ऑफरसह १,२५० रुपयांची झटपट सूट मिळू शकते. याचा अर्थ फोनवर तुम्ही १२ हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता. हा आयफोन काळ्या, निळ्या आणि हिरव्या रंगात उपलब्ध आहे.

iPhone 12
PS-1 Teaser : अमिताभ बच्चन करणार सून ऐश्वर्याच्या चित्रपटाचा टीझर रिलीज
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com