तुम्हालापण लघवी करताना होतोय त्रास ? मग हे वाचाच....
तुम्हालाही लघवी करताना जळजळ आणि वेदना होतात का? तसे असल्यास ते खूप मोठ्या समस्येचं लक्षण असू शकतं. असे अनेक लोक आहेत ज्यांना कधीतरी लघवी करताना वेदनांच्या समस्येला सामोरं जावं लागतं. याबाबत मिसिसिपी येथील स्त्रीरोगतज्ज्ञ लकीशा रिचर्डसन यांनी सांगितले की त्यांच्याकडे येणाऱ्या ३० टक्के रुग्णांना लघवी करताना वेदना होतात.
लघवी करताना वेदना हे विविध संक्रमणांचे लक्षण असू शकते. अशावेळी बरे होण्यासाठी उपचारांची आवश्यकता असते. अशा स्थितीत लघवी करताना कोणत्या कारणांमुळे वेदना होतात हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन - युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे कुणालाही होऊ शकते. परंतु हा संसर्ग महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. या संसर्गामुळे महिलांना लघवी करताना वेदना होतात. जेव्हा बॅक्टेरिया मूत्राशयात प्रवेश करतात तेव्हा हा संसर्ग होतो. मूत्राशयापर्यंत पोहोचल्यानंतर हे जीवाणू खूप वेगाने वाढू लागतात आणि मूत्र अम्लीय बनवतात. त्यामुळे लघवी करताना जळजळ जाणवते. लघवी करताना वेदना सोबत UTI च्या बाबतीत तुम्हाला वारंवार लघवी चेक करण्याची गरज भासते.